Video | दसरा मेळावा; मनसेचं उद्धव ठाकरेंना आव्हान काय?

| Updated on: Sep 24, 2022 | 11:38 AM

अनधिकृत मदरशांवर काय भूमिका आहे, मराठी माणसं मुंबई सोडून का चाललेत, या सगळ्यांवर तुम्ही बोललात तर हे मैदान मिळाल्याला अर्थ राहिल, असं आव्हान मनसेनं दिलंय. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा फक्त राज ठाकरे चालवत आहेत, असं वक्तव्यही देशपांडे यांनी केलंय. 

मुंबईः शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच (Uddhav Thackeray) होणार, यावर हायकोर्टानं (High court) शिक्कामोर्तब केलंय. यामुळे शिवसेनेच्या गोटात उत्साह संचारलाय. पण मनसेनं दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांबद्दल बोलणार आहात का? तिथे जाऊन फक्त शिव्या घालण्याला काय अर्थ आहे?महाराष्ट्रातल्या मराठी माणसांबद्दल बोलणार आहात का? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलाय. तसंच तुमची मशीदीवरील भोंग्यांवर काय भूमिका आहे? अनधिकृत मदरशांवर काय भूमिका आहे, मराठी माणसं मुंबई सोडून का चाललेत, या सगळ्यांवर तुम्ही बोललात तर हे मैदान मिळाल्याला अर्थ राहिल, असं आव्हान मनसेनं दिलंय. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा फक्त राज ठाकरे चालवत आहेत, असं वक्तव्यही देशपांडे यांनी केलंय.

Published on: Sep 24, 2022 11:27 AM
Video : भाषण सुरु असताना त्यांनी मोबाईल बघितला म्हणून अब्दुल सत्तार यांना राग आला?
पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान PFI चा हल्ल्याचा कट, पाहा नेमकं काय झालं?