BMC नं भांडुपला गाडी पाठवून ‘त्यांच्या’ जिभेची नसबंदी करावी, संजय राऊत यांच्यावर कुणाची जहरी टीका?
VIDEO | भांडुपला गाडी पाठवा, राऊतांच्या जिभेची नसबंदी करा, त्यांच्या बोलण्याला पाय-डोकं नाही अन् कुठंही..., संजय राऊतांवर कुणी केली खालच्या पातळीवर टीका
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका करण्यात आली आहे. बीएमसीनं एक गाडी भांडूपला पाठवावी. यांच्या जिभेची नसबंदी करून द्यावी. कारण त्यांच्या बोलण्याला पाय असतात ना डोकं, कुठंही काहीही बोलायचं, असे भाष्य करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे . संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर भाजपचा पोपट अशा शब्दात टीका केली होती. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले आहेत. मनोरुग्णांवर मी फार बोलणार नाही, पण बीएमसीला त्यांची एक गाडी भांडूपला नेण्याची विनंती करणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी आधीही सांगितलं होतं. आता त्याच वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केल्याचे पाहायला मिळाले. भुंकणारे भुंकत राहतात. ऐकणारे ऐकत राहतात. मी तर परवा सांगितलंय, भांडुपला एक गाडी पाठवा. यांच्या जिभेची नसबंदी करून द्या… मनोरुग्णांवर काय बोलायचं, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलाय.