‘मी समोर असतो तर संजय राऊत यांच्या कानाखाली मारली असती’, मनसे नेता आक्रमक
VIDEO | मनसे नेते संदीप देशपांडे यांची संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका, संजय राऊत वेडे झालेत अन्... बघा काय म्हणाले
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला असून शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह घेण्यासाठी 2000 कोटी रूपयांचा व्यवहार झाल्याचे ते म्हटले आहे. यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केले असून त्यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, असे आरोप प्रत्यारोप ते नेहमीच करत असतात, मात्र ज्या प्रकारची त्यांची भाषा आहे, ती अत्यंत चुकीची आहे. तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला कोणालाच वाटलं नाही त्यांना थांबवावे, अशी खंतही संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, राऊत यांना माहित आहे, आपण जेवढं घाणेरडे बोलतो तेवढेच प्रसिद्ध होतो. कुठल्या सडलेल्या मेंदूची मनोवृत्ती आहे मला माहिती नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आणखी बघा काय म्हणाले संदीप देशपांडे…
Published on: Feb 19, 2023 02:57 PM
Latest Videos