उद्धव ठाकरे यांच्या सभेला लोकं कंटाळली? 'या' नेत्यानं थेट कारणंच सांगितली, काय म्हणाले बघा...

उद्धव ठाकरे यांच्या सभेला लोकं कंटाळली? ‘या’ नेत्यानं थेट कारणंच सांगितली, काय म्हणाले बघा…

| Updated on: Apr 24, 2023 | 10:46 AM

VIDEO | उद्धव ठाकरे यांच्या पाचोऱ्यातील सभेवर या नेत्यानं केली सडकून टीका, काय म्हणाले बघा व्हिडीओ

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यात जाहीर सभा झाली. ही सभा विशाल झाल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला. यासभेत उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे गटातील नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांवर जोरदार टीका केली. दरम्यान, पाचोऱ्यातील उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या जाहीर सभेवर मनसेकडून देखील भाष्य करण्यात आलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्यासभेवर देखील टीका केल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील लोकं उद्धव ठाकरे यांच्या सभेला कंटाळले असल्याचे म्हणत संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या सभेला लोकं का वैतागली, कंटाळली यावर बोलताना संदीप देशपांडे यांनी थेट कारणंच सांगितली. ते म्हणाले लोकांना रडणारे नाही तर लढणारे नेते आवडतात. उद्धव ठाकरे यांच्या सभेत काही नाविन्य नसतं तर तेच ५० खोके, खंजीर, अन्याय आणि बदला इतकंच आहे. विकासाचा मुद्दा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 24, 2023 10:36 AM