Ravindra Chavan यांनी राजीनामा द्यावा अन्…, मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून मनसे आक्रमक
VIDEO | मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपला राजीनामा द्यावा, मनसेचा आक्रमक पवित्रा, 'जनाची नाही तर मनाची लाज ठेवून राजीनामा दिला पहिजे'
मुंबई, १८ सप्टेंबर २०२३ | मुंबईमध्ये शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणाऱ्या काही अभियांत्यांचा सत्कार सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर या अभियांत्यांनी त्यांचा केलेला सत्कार परत करावा, अशी मागणी शनिवारी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली. तर मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावरून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपला राजीनामा द्यावा, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी लावून ठरली आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या कामावरून मनसेने असा आक्रमक पवित्रा घेतल्याचे समोर आले आहे. ‘मुंबई गोवा महामार्गवर जे हाल झालेत, दोन तीन महिने वारंवार सांगत होतो की, अशी थुकपट्टी चालू आहे. कोकणात जाण्यास 16-18 तास लागत आहे. स्वतःची पाठ थोपटणाऱ्या रवींद्र चव्हाण यांची यातून पोल खोल झाली. जनाची नाही तर मनाची लाज ठेवून राजीनामा दिला पहिजे आणि कोकणकरांची माफी मागितली पाहिजे’, असे संदीप देशपांडे म्हणाले.