पंकजा मुंडे यांच्या त्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक, म्हणाले, 'तुम्ही फक्त नाव सांगा..'

पंकजा मुंडे यांच्या त्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक, म्हणाले, ‘तुम्ही फक्त नाव सांगा..’

| Updated on: Sep 29, 2023 | 4:23 PM

VIDEO | तृप्ती देवरूखकर या मराठी महिलेला मुलुंडमध्ये घर नाकारलं, 'माझं सरकारी घर सोडून दुसरं घर घ्यायचं होतं, तेव्हा मला देखील असा अनुभव आला हे फार दुर्दैवी आहे', भाजप नेते पकंजा मुंडे यांच्या वक्तव्यावर मनसे नेते संदीप देशपांडे आक्रमक, बघा काय केलं भाष्य

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ | ‘माझं सरकारी घर सोडून दुसरं घर घ्यायचं होतं, तेव्हा मला देखील असा अनुभव आला हे फार दुर्दैवी आहे’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशपांडे म्हणाले, पंकजा मुंडे यांनी उशिरा प्रतिक्रिया दिली. ज्यावेळी त्यांना जो अनुभव आला तेव्हा त्यांनी सांगितलं असतं तर मनसैनिकांनी पंकजा मुंडे यांना तेव्हाच घर मिळवून दिलं असतं. ते पुढे असेही म्हणाले, आजही पंकजा मुंडे यांना विनंती आहे की, कुठल्या सोसायटीने घर नाकारलं हे त्यांनी सांगावं, त्या लोकांना धडा शिकवण्याचं काम मनसैनिक करतील. पकंजा मुंडे एकट्या नाही. मराठी माणसासाठी महाराष्ट्र सैनिक कायम तत्पर असतील असा शब्दही त्यांनी दिला.

Published on: Sep 29, 2023 04:23 PM