‘… तरी ते दगडच’, असे म्हणत ‘मनसे’चा संजय राऊत यांच्यावर नेमका काय पलटवार?
VIDEO | राज ठाकरे यांच्या 'त्या' टीकेवर संजय राऊत यांचं प्रत्युत्तर अन् पुन्हा मनसे नेत्याचा संजय राऊत यांच्यावर पलटवार, बघा काय म्हणाले?
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. काही स्वयंभू हे देव होतात. काही स्वयंभू ना कितीही शेंदूर फासला तरी दगडच राहतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं होतं. राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. दोघेही स्वयंभू आहेत. त्यामुळे मी त्यांना काहीच सल्ला देऊ शकत नाही, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला होता. राज ठाकरे यांच्या या टीकेचा संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. राऊत यांनी राज ठाकरे यांची तुलनाच शेंदूर फासलेल्या दगडाशी केली आहे. ‘आम्ही स्वयंभू आहोत. जे स्वयंभू दैवत असते त्याच्या मागे जनता जाते. जे शेंदूर फासलेले असतात त्यांच्या मागे कुणी जात नाही. दगडांना शेंदूर फासतात आणि यांनाच देव माना असं सांगतात. त्यांना लोकं वाकून नमस्कार करत नाहीत. जे स्वयंभू असतात त्या नेत्यांना आणि दैवतांनाच श्रद्धेचा मान मिळतो. तो ठाकरेंना मिळतो. कुणाची पोटदुखी होत असेल तर त्यांनी यावं. आमच्याकडे औषध आहे’, असं संजय राऊत म्हणाले होते. त्यानंतर मनसेकडून राऊत यांना काय उत्तर दिलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.