Video | बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळं… उद्धव ठाकरेंवर थेट टीका
उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील गोरेगाव येथील शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर मिंधे तसेच मुन्नाभाई या शब्दात टीका केली. त्यावर शिंदे गटासह आता मनसेकडूनही प्रत्युत्तर आलंय.
मुंबईः उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्याईवर जगणारे बांडगुळ आहे, अशी घणाघाती टीका मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व शून्य आहे. फक्त बाळासाहेब ठाकरेंमुळेच (Balasaheb Thackeray) ते राजकारणात टीकून आहेत, असं वक्तव्य देशपांडे यांनी केलंय. कमजोर मुलावर आई-वडिलांचं प्रेम जास्त असतो. पण कर्तृत्ववान मुलावर त्यांचा विश्वास असतो. त्यामुळे यांचं कर्तृत्व शून्य आहे. म्हणूनच ते इतरांना मिंधे, मुन्नाभाई असं म्हणतात, असा टोला संदीप देशपांडेंनी यांनी मारला आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील गोरेगाव येथील शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला संबोधित केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंवर मिंधे तसेच मुन्नाभाई या शब्दात टीका केली. त्यावर शिंदे गटासह आता मनसेकडूनही प्रत्युत्तर आलंय.