राज ठाकरेंचा हात सोडल्यानंतर वसंत मोरेंना ऑफरवर ऑफर, तात्या कोणाचा झेंडा हाती घेणार?
पुण्यातून लोकसभा लढवण्यास वसंत मोरे इच्छुक आहेत तर ते दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांचा हात सोडून मनसे सोडली. त्यानंतर आता वसंत मोरे यांना मोठ्या पक्षांच्या ऑफर येणं सुरू झाली आहे.
मुंबई, १४ मार्च २०२४ : मनसे नेते वसंत मोरे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना ठाकरे गट, अजित पवार गट आणि काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली आहे. पुण्यातून लोकसभा लढवण्यास वसंत मोरे इच्छुक आहेत तर ते दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांचा हात सोडून मनसे सोडली. त्यानंतर आता वसंत मोरे यांना मोठ्या पक्षांच्या ऑफर येणं सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील रूपाली ठोंबर पाटील यांनी वसंत मोरे यांची भेट घेतली. काँग्रसेचे मोहन जोशी यांनी वसंत मोरेंची भेट घेत त्यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिलं. तर संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना फोन करून उद्धव ठाकरे यांच्या पक्षात येण्याची ऑफर दिली. लोकसभा निवडणूक लढवायची असा निर्धारच वसंत मोरे यांनी केलाय. त्यामुळे आता मनसेला राम राम ठोकल्यानंतर कोणत्या पक्षाचा झेंडा वसंत मोरे धरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.