महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार कोण? मनसे नेत्यानं काय व्यक्त केली इच्छा?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार कोण? मनसे नेत्यानं काय व्यक्त केली इच्छा?

| Updated on: Sep 03, 2023 | 12:52 AM

VIDEO | राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार कोण होणार? आमदार होण्याची चर्चा सुरू असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केली मोठी इच्छा? थेट म्हणाले

पुणे, २ सप्टेंबर २०२३ | मनसे नेते वसंत मोरे यांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पुण्यात बोलत असताना त्यांनी खासदार होण्याबाबत इच्छा बोलून दाखवली. ते म्हणाले, ‘राज ठाकरे यांनी संधी दिल्यास राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिला खासदार वसंत मोरे असणार, मला पुण्यचा खासदार व्हायचे आहे’, अशी मोठी इच्छा मनसे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केली आहे. तुमच्याकडे आमदार म्हणून पाहिले जात आहे, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी वसंत मोरे यांना विचारला असता, वसंत मोरे यांनी खासदार होण्याची इच्छा माध्यम प्रतिनिधींसमोर व्यक्त केली.

Published on: Sep 03, 2023 12:52 AM