तोपर्यंत संयम… शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा? यशवंत किल्लेदार यांनी काय केली फेसबुक पोस्ट?
अमित शाह यांच्यासोबत नेमकी कोणती चर्चा झाली त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलतील, असा आशय सांगणारी फेसबुक पोस्ट माहिम विभाग अध्यक्ष मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. काय म्हटलंय यशवंत किल्लेदार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये?
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत नेमकी कोणती चर्चा झाली त्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलतील, असा आशय सांगणारी फेसबुक पोस्ट माहिम विभाग अध्यक्ष मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले की, देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजला आहे. त्यामुळे देशासोबतच महाराष्ट्रातील राजकिय घडामोडींना देखील अत्यंत वेग आला आहे. कोणाला किती जागा मिळणार? यावरून सर्वच पक्षांमध्ये दिवस रात्र चर्चा सुरू आहे. या सगळ्या गदारोळात देशाचे गृहमंत्री अमित शहांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत दिल्ली येथे घेतली आणि प्रसार माध्यमातून दिवस रात्र चर्चा सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे काय नेमकी भूमिका घेणार? हा व यासोबतच असंख्य प्रश्न महाराष्ट्राला पडलेले असून येत्या गुढी पडावा मेळाव्यात राज ठाकरे सर्वांच्या सर्व प्रश्नांची उत्तर देतीलच तोपर्यंत आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरेंच्या आदेशानुसार संयम बाळगून आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र..!