‘शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील’, मनसे नेत्याची गुलाबराव पाटलांवर जिव्हारी लागणारी टीका
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांचा झोलर असा उल्लेख केला आहे. यानंतर शिंदे यांच्या तमाशातील गुलाबराव पाटील नाच्या आहे, असं योगेश चिले यांनी म्हणत जिव्हारी लागणारी टीका केली.
‘राज ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या गुलाबराव पाटील यांची औकात आहे का? एकनाथ शिंदे यांच्या तमाशातील गुलाबराव पाटील नाच्या आहे.’, असं म्हणत मनसे नेते योगेश चिले यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते गुलाबराव पाटील यांच्यावर खालच्या पातळीची टीका केली आहे. यावेळी योगेश चिले यांनी तमाशातील गणपतराव पाटील यांचा उल्लेख करत गुलाबराव पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘गणपतराव पाटील हे चांगलं काम करायचे म्हणून त्यांचा आदर होता. पण या नाच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय विचार आहे ते एकदा विचारा’, असं म्हणत योगेश चिले यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. दरम्यान, एक खोक्याभाई काय घेऊन बसलात अख्खी विधानसभा भरलेली आहे, असं वक्तव्य मनसेच्या पदाधिकारी बैठकीत राज ठाकरे यांनी केलं होतं. यावरून बोलताना आशिष शेलार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. ‘अस्तित्व जाणवून देण्यासाठी राज ठाकरेंनी वक्तव्य केलं. असं वक्तव्य करून आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं.. हे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे’, असं आशिष शेलार म्हणाले.

पंतप्रधान मोदींचा नागपूर दौरा; आरएसएसच्या मुख्यालयाला दिली भेट

हरीभाऊ बागडेंच्या हेलिकॉप्टरला अपघात; व्हिडिओ व्हारायल

साईबाबांच्या पालखी सोहळ्यात आदित्य ठाकरेंना ढोल वाजवण्याचा मोह अनावर

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त नागपूरात जोरदार बॅनरबाजी
