… तेव्हा झोपा काढल्या का? मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर मनसे नेत्याची सरकारवर हल्लाबोल
VIDEO | मराठा आरक्षणावर मनसे आमदार राजू पाटील आक्रमक झाले आहेत. राजू पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जरांगे पाटील यांना आश्वासन दिलेलं काही दिवसात आरक्षण दिले जाईल, त्यांनी तो वेळ दिला होता त्यावेळेस यांनी काय झोपा काढल्या का? राजू पाटलांचा सवाल
ठाणे, २६ ऑक्टोबर २०२३ | मराठा आरक्षणावर मनसे आमदार राजू पाटील आक्रमक झाले आहेत. राजू पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सर्वांची इच्छा आहे तर आरक्षण का देत नाही. जरांगे पाटील यांना आश्वासन दिलेलं काही दिवसात आरक्षण दिले जाईल, त्यांनी तो वेळ दिला होता त्यावेळेस यांनी काय झोपा काढल्या का? असा सवाल राजू पाटलांनी केलाय. तर आता टोकाशी आल्यावर त्यांना सांगतात उपोषणाला बसू नका, दोन पावलं मागे घ्या, अजून वेळ द्या, पण हे प्रकार होताच का दिल्लीला गेलेत? यांना जातीपातीत भांडण लावून राजकारणाचा जो पोर खेळ सुरू आहे व जी विष्टा झाली आहे याच्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे सर्व काही करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. आरक्षण मिळावं यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील, जाती न्याय जनगणना करावी लागेल आणि यागोष्टीसाठी कोणी पुढाकार घेतला नाही त्यामुळे हे तोंडाला पान पुसायचं असे सांगत जोरदार टीका केली आहे.