‘एप्रिल फूल, कधी होणार पलावा पूल’, ‘मनसे’नं केली बॅनरबाजी
VIDEO | 'एप्रिल फूल, कधी होणार पलावा पूल', डोंबिवलीमध्ये मनसेने केली बॅनरबाजी अन् सत्ताधाऱ्यांना केला सवाल?
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी सध्या लावलेल्या कामाच्या धडाक्याने चांगलेच चर्चेत आहे. दरम्यान, नुकतीचं त्यांनी डोंबिवलीतील पलावा पुलाच्या कामासंदर्भात मोठी बॅनरबाजी करत त्या प्रश्नावर आवाज उठवला आहे. डोंबिवलीतील कोपर पुलाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने पलावा परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे. अनेक वेळा मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही काम धिम्या गतीने सुरू असल्याने आज मनसे आमदार राजू पाटील यांनी 1 एप्रिलचे औचित्य साधून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केल्याचे समोर आले आहे. डोंबिवलीमधील पलावा परिसरात एप्रिल फूल कधी होणार पलावाचा पूल अश्या आशयाची बॅनरबाजी करत पालिका प्रशासन आणि सत्ताधा-यांवर निशाणा साधला आहे. आता तरी पालिका प्रशासन कामाला वेग देईल का हे पाहणे योग्य ठरणार आहे.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची बॅनरबाजी

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट

मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा

'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
