अजित पवार यांना मनसेच्या नेत्यानं कसल्या आणि का दिल्या शुभेच्छा?
VIDEO | एकीकडे अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा तर दुसरीकडे मनसेच्या नेत्यानं दिल्या अजित दादांना शुभेच्छा, काय कारण?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा होतेय ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार… अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या चर्चेदरम्यान, मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, या सत्तेच्या राजकारणात अश्यक्य असे काहीच नाही. ज्या शक्यता वर्तवल्या जातात त्यात सत्य असेल नसेल माहित नाही, परंतु हे आमचे क्षेत्र नाही किंवा आम्हाला यामध्ये पडायचं नाही. आम्हाला लोकांची कामे करायची आहेत. त्यांच्याबद्दल काही असेल तर आम्हला विचारा परुंतु अश्या काही गोष्टी आहेत, त्या वारंवार सातत्याने वेगवेगळ्या फॉरमॅट मध्ये घडतायत, सध्या तो पायंडा पडलेला आहे. त्यामुळे अशक्य असे काहीच नसल्याचे राजू पाटील यांनी म्हटले तर भाजप आणि राष्ट्रवादी युती बद्दल बोलताना ते म्हणाले, ‘तो प्रश्न भाजप आणि राष्ट्रवादीचा आहे. त्यांना वाटत असेल सुप्रीम कोर्टात काही वेगळा निर्णय येईल, ते त्यांचं सरकार टिकवायचे त्यांचे प्रयत्न करत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.’