KDMC मध्ये महापौर कोणाचा? यावरून भाजप, मनसे आणि शिंदे गटात जुंपली, बघा काय केला वार-पलटवार?
VIDEO | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपाचं संख्याबळ अधिक आणि महापौरही भाजपाचा बसेल, भाजपाचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्या दाव्यावर मनसे आमदार राजू पाटील यांनी काय दिलं प्रत्युत्तर?
ठाणे, १२ सप्टेंबर २०२३ | कल्याण डोंबिवली शहरात यंदा वेगळं चित्र निर्माण होणार आहे. पालिका निवडणूकीत भाजपाचं संख्याबळ अधिक असेल आणि महापौरही भाजपाचा बसेल असा दावा भाजपाचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केला होता. यावर मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गटापुढे भाजपाचे काही चालत नाही असं विधान राजू पाटील यांनी केलं आहे. केडीएमसीत महापौर बसवायच्या वार्ता नंतर करा, आधी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये एक सीनियर पिआय बसवून दाखवा. शिंदे गटापुढे भाजपचे काही चालत नाही असं म्हणत दोन्ही पक्षांमध्ये सध्या काय सुरू आहे, याबाबत खुद्द मनसेने खुलासा केला आहे. तर पाटलांच्या विधानाला कल्याण पूर्वेचे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनीही पाठींबा दर्शवला आहे. तर सत्तेत शिंदे फडणवीस एकत्र असले तरी विशेषतः कल्याण डोंबिवली शहरात दोन्ही पक्षात वितुष्ट वाढत असल्याचचं समोर येत आहे. मात्र केडीएसमीत महापौर कोणाचा असणार ? तो कोण होणार? किती घोडेबाजार होणार? हे येणाऱ्या दिवसात समजेलच