उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद जिन्ना, ते मुस्लिमांच्या प्रेमात अन् मुस्लिम..; मनसे नेत्याची खोचक टीका
ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम ठाकरेंच्या प्रेमात आहेत, असे वक्तव्य करत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीकाही केली. शंकराचार्यांचे आता पाय धुतले तरी हिंदू ठाकरेंकडे येणार नाहीत, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद अली जिन्ना आहेत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली तर ठाकरे मुस्लिमांच्या आणि मुस्लिम ठाकरेंच्या प्रेमात आहेत, असे वक्तव्य करत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीकाही केली. शंकराचार्यांचे आता पाय धुतले तरी हिंदू ठाकरेंकडे येणार नाहीत, असे म्हणत प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. विशाळगड प्रकरणावर संजय राऊत यांची कोणतीही प्रतिक्रिया का आली नाही? आता त्यांचा सकाळचा माईक का बंद झाला? असा सवाल करत खोचक टोलाही प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांना लगावला. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख औरंगजेब फॅन क्लब प्रमुख असा केला. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन बोलत होते.