भाजप आणि अजित पवार यांच्यावर राज ठाकरे यांची तोफ, मिमिक्री करत काय साधला निशाणा?
VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा भाजपवर सडकून टीका अन् मिमिक्री करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर साधला निशाणा, पनवेल येथे झालेल्या निर्धार मेळाव्यातून राज ठाकरे यांचा टोला
मुंबई, १६ ऑगस्ट २०२३ | मनसे अध्यक्ष राज ठाकरे रस्त्यांच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मैदानात उतरले. त्यावेळी राज ठाकरे यांनी पनवेलच्या मेळाव्यातून आपला मोर्चा भाजप आणि अजित पवार यांच्याकडे वळवला. अजित पवार यांची मिमिक्री करत राज ठाकरे यांनी अजित दादा यांचा खरपूस समाचारच घेतला. पनवेलच्या निर्धार मेळाव्यातून राज ठाकरे यांनी रस्त्यांच्या खड्ड्यांवरून सरकारला घेरलंय आणि जोरदार आंदोलनाचे आदेशही कार्यकर्त्यांना दिलेत. त्याचवेळी राज ठाकरे भाजपसह अजित पवार यांच्यावरही बरसलेत. टोल कर्मचाऱ्यांनी अमित ठाकरे यांच्यासोबत अरेरावी केल्याचा आरोप करत गेल्या महिन्यात सिन्नरचा टोल नाका मनसैनिकांनी फोडला. यावरून भाजपने मनसेला सुनावलं आणि ट्वीट करत म्हटलं, ‘कधीतरी टोल नाका बांधायला शिका आणि शिकवा’…असं निशाणा साधला. तर याला प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांनी इतरांचे आमदार फोडण्यापेक्षा स्वतःचा पक्ष उभा करायला शिकावं, असा खोचक टोला लगावला. बघा काय म्हणाले नेमकं राज ठाकरे….