Raj Thackeray यांच्या जाळपोळीच्या इशाऱ्यानंतर मुलुंडचा टोल जाळला? केबिन पेटवणारे कोण? हे अद्याप अस्पष्ट

Raj Thackeray यांच्या जाळपोळीच्या इशाऱ्यानंतर मुलुंडचा टोल जाळला? केबिन पेटवणारे कोण? हे अद्याप अस्पष्ट

| Updated on: Oct 11, 2023 | 10:44 AM

tv9 Special Report | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाके जाळण्याचा इशारा दिला आणि मुलुंडमध्ये टोलनाक्यावरील केबिन पेटवण्यात आल्याची घटना घडली अर्थात, केबिन पेटवणारा व्यक्ती कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टोलनाके जाळण्याचा इशारा दिला आणि तसा प्रयत्न मुंबईच्या मुलुंडमध्ये झाल्याचं सीसीटीव्हीत कैद झालंय. सीसीटीव्ही फुटेजमध्ये टोलनाक्याच्या केबिनमध्ये एक व्यक्ती 3 टायर घेऊन येतो. नंतर खिशातून पेट्रोलनं भरलेली बाटली काढतो आणि टायरवर पेट्रोल टाकून टायर पेटवतो. केबिनमध्ये आग लागताच हा व्यक्ती निघून जाताना दारही लावून जातो. केबिन कशाप्रकारे जाळण्यात आली हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालंय. ही घटना राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर 3 वाजून 45 मिनिटांनी घडली. केबिन जाळल्याच्या घटनेनंतर आता मुलुंड टोलनाक्यावर मुंबई पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय. तर कारसह छोट्या वाहनांकडून टोलवसुली सुरु आहे. याच मुलुंडच्या टोलनाक्यावर अविनाश जाधव सर्वच टोलनाक्यावर छोट्या वाहनांना टोल माफ आहे, हे सांगणारा फडणवीसांचा व्हिडीओ कार चालकांना दाखवत होते. यावेळी त्यांचीही, पोलिसांसोबत हुज्जतही झाली. राज ठाकरेंच्या जाळपोळीच्या इशाऱ्यानंतर, पहिली घटना मुलुंडमध्ये घडली आता ही केबिन पेटवणारे नेमके कोण आहेत ? हे अद्याप स्पष्ट नाही.

Published on: Oct 11, 2023 10:44 AM