राज ठाकरे यांच्याबद्दल 'त्यानं' काढले अपशब्द अन् मनसैनिकांनी घडवली अशी अद्दल

राज ठाकरे यांच्याबद्दल ‘त्यानं’ काढले अपशब्द अन् मनसैनिकांनी घडवली अशी अद्दल

| Updated on: Dec 19, 2023 | 2:04 PM

राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या व्यक्तीला मनसैनिकांकडून चांगलाच चोप देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांच्याबद्दल गैर शब्द काढणाऱ्याला मनसैनिकांनी मनसे स्टाईलने अद्दल घडवली आहे. ही सर्व घटना कॅमेरात कैद झाली आहे.

मुंबई, १९ डिसेंबर २०२३ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल एका परप्रांतीय व्यक्तीने अपशब्द काढले. राज ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या व्यक्तीला मनसैनिकांकडून चांगलाच चोप देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांच्याबद्दल गैर शब्द काढणाऱ्याला मनसैनिकांनी मनसे स्टाईलने अद्दल घडवली आहे. कर्जत इथे राहणाऱ्या या उत्सव प्रजापती नावाच्या व्यक्तीनं हे अपशब्द काढले. त्याची ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. ती ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रायगड मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी त्या व्यक्तीला मनसे स्टाईल उत्तर देत त्याच्याकडून माफी मागवून घेतली, ही सर्व घटना कॅमेरात कैद झाली आहे.

Published on: Dec 19, 2023 01:50 PM