राज ठाकरे लोकसभा लढवणार की नाही? निवडणूक लढवण्यासंदर्भात राज ठाकरे यांचं सूचक वक्तव्य
राज ठाकरे लोकसभा लढवणार की नाही? अशी चर्चा सुरू असताना निवडणूक लढवण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी आज सूचक वक्तव्य केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात सूचक वक्तव्य केलं
मुंबई, १२ मार्च २०२४ : कोणत्याही क्षण लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्याची शक्यता असतानाच आगामी लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काही मागे नाही. गेल्या काही महिन्यांपासून महायुती आणि महाविकास आघाडीसह लोकसभा निवडणुकीच्या चाचपणीसाठी राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष देखील दौरे आणि बैठकांचं सत्र घेताना दिसतोय. तर राज ठाकरे यांनी नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे भागाचे दौरेही सुरू केले आहेत. अशातच राज ठाकरे लोकसभा लढवणार की नाही? अशी चर्चा सुरू असताना निवडणूक लढवण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी आज सूचक वक्तव्य केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचा आढावा घेतला. दादरच्या ब्राह्मण सेवा संघ हॉलमध्ये बैठक पार पडली यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकसभा निवडणूक लढवायची की नाही ते येत्या 3 ते 4 दिवसात स्पष्ट करणार असल्याची भूमिकाही त्यांनी मांडली.