मनसे युती करणार? 'हे' प्रश्न विचारून राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल

मनसे युती करणार? ‘हे’ प्रश्न विचारून राज ठाकरे यांनी जाणून घेतला पदाधिकाऱ्यांचा कल

| Updated on: Feb 22, 2024 | 1:53 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात युतीची चाचपणी सुरू केली आहे. मुंबईतील बांद्रा येथे सोमवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी युतीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारत त्यांनी पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला आहे.

मुंबई, २२ फेब्रुवारी २०२४ : गेल्या काही दिवसांपासून मनसे हा युती करणार असल्याच्या चर्चा जोर धरताना दिसत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षात युतीची चाचपणी सुरू केली आहे. लोकसभा मतदारसंघात निरीक्षकांच्या बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून ही चाचपणी करण्यात आली आहे. मुंबईतील बांद्रा येथे सोमवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भातील चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी युतीसंदर्भात पदाधिकाऱ्यांना प्रश्न विचारत त्यांनी पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला आहे. एनडीएसोबत किंवा स्वबळावर निवडणुका लढवा, यावर मनसेच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी पसंती दर्शवल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये एनडीएसोबत निवडणूक लढवावी का? इंडिया आघाडीसोबत निवडणूक लढवावी का? किंवा स्वबळावर निवडणूक लढवावी का? निवडणूक लढवण्याबाबत काय वाटतं? अशा प्रश्नांचा यामध्ये समावेश होता.

Published on: Feb 22, 2024 01:53 PM