Video | ‘मी आंदोलन केल्यानंतर…बॉलीवूडच्या अनेक लोकांना…’ काय म्हणाले राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीमुंबईतील एका कार्यक्रमात संबोधित करताना कोणी समोर येऊ द्या मराठीतूनच बोला. प्रत्येक राज्य त्यांची भाषा, लोक जपत असतो. आपण मात्र घरंगळत दुसऱ्या भाषेत का जातो ? असाही सवाल त्यांनी केला. नवी मुंबईत मराठी भाषा भवन उभारले जात आहे ही चांगली गोष्ट आहे. परंतू आपण आपली भाषा जपली नाही तर बिकट परिस्थिती निर्माण होईल असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नवी मुंबईत मराठी भाषेवर जोरदार भाषण
नवीमुंबई | 28 जानेवारी 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषे संदर्भात पुन्हा एकदा कान टोचले. ‘भाषा मरतात देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे’…अशी कुसुमाग्रजांच्या कवितेची ओळ वाचून दाखवित मराठीतून बोलण्याचा सल्ला दिला. मराठी भाषा भवन होत आहे हे सर्व चांगले आहे. मराठी भाषा ही तुमची ओळख तुम्ही, ती ओळख तुम्ही संपवून टाकत आहात. युरोपमधील कोणत्याही देशापेक्षा आपण जास्त आहोत. प्रत्येक देश, प्रत्येक राज्य त्यांची भाषा जपत असतो, आपली लोक जपत असतात. प्रत्येक राज्य त्यांची भाषा बोलत असतात. आपण गोट्या आहोत हा घरंगळत जायला. ‘आपण काय गोट्या आहोत काय? आम्ही का घरंगळत जातो दुसऱ्या भाषेमध्ये.? दुसऱ्या राज्यात कोणी दुसरी भाषा बोलते का? कोणीही समोर येऊ देत आपण मराठी बोला असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. दुसरे कोणी मराठी मोडके तोडके बोलत असेल तर त्यांना हसू नका, त्यांना सुधरवा. आपण चेष्टा केल्यानेही दुसऱ्या भाषिक मराठी बोलत नाहीत. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना राज ठाकरे यांनी विनंती केली 1 ली ते 10 वी मराठी भाषा अनिर्वाय करण्याची विनंती यावेळी केली. मी आंदोलन केले तेव्हा बॉलीवूडच्या मंडळींना कंठ फुटले आणि ते मराठी बोलायला लागले. म्हणजे मराठी येत होते पण बोलत नव्हते असेही ते म्हणाले.