नवी मुंबईतील वाशीच्या सेंट लॉरेन्स शाळेबाहेर मनसेचे कार्यकर्ते धडकले, आक्रमक होण्याचं कारण काय?

नवी मुंबईतील वाशीच्या सेंट लॉरेन्स शाळेबाहेर मनसेचे कार्यकर्ते धडकले, आक्रमक होण्याचं कारण काय?

| Updated on: Jun 14, 2023 | 11:00 AM

VIDEO | वाशीच्या सेंट लॉरेन्स शाळेबाहेर मनसे कार्यकर्त्यांचे शाळा प्रशासनाविरोधात आंदोलन, काय घडला प्रकार?

मुंबई : नवी मुंबईतील वाशीच्या सेंट लॉरेन्स शाळेमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वॉशरूममध्ये जय श्री रामच्या घोषणा दिल्याने त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. दहा ते बारा विद्यार्थ्यांनी जय श्री रामच्या घोषणा दिल्या होत्या त्यापैकी सहा जणांना काढून टाकल्याचा प्रकार घडला. यानंतर मनसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सेंट लॉरेन्स शाळेबाहेर मनसेचं आंदोलन सुरू आहे. जय श्री रामच्या घोषणा दिल्याने शाळेकडून विद्यार्थ्यांचं निलंबन करण्यात आल्यानं मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी मनसेचे कार्यकर्ते शाळा प्रशासनाविरोधात आक्रमक झाल्याचे पाहिला मिळाले आणि त्यांनी घोषणाबाजीही केली. तर मनसे कार्यकर्ते सेंट लॉरेन्स शाळेच्या मुख्यध्यापकांना याप्रकरणी जाबही विचारणार आहे.

Published on: Jun 14, 2023 11:00 AM