महायुतीसाठी भाजपचा ग्रीन सिग्नल पण शिंदेंचा नकार?  कारण देत राज ठाकरे स्पष्टच म्हणाले...

महायुतीसाठी भाजपचा ग्रीन सिग्नल पण शिंदेंचा नकार? कारण देत राज ठाकरे स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Jan 08, 2025 | 12:21 PM

निकालानंतर पहिल्यांदा मनसे नेत्यांची राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर बैठक झाली. या बैठकीत स्वतः राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनी मनसेची युती फिस्कटली असल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणुकीत भाजप, मनसेसोबत युती करण्यासाठी तयार होती, मात्र एकनाथ शिंदे तयार नव्हते, असा आरोप राज ठाकरेंनी शिंदेवर केला.

मनसेला सोबत घेण्यासाठी भाजपचा ग्रीन सिग्नल होता पण एकनाथ शिंदे हेच तयार नसल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली याचं कारण सांगितलं. विधानसभा निवडणुकीत मनसे भाजपसोबत युती करण्यासाठी तयार होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच तयार नव्हते, असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केलाय. निकालानंतर पहिल्यांदा मनसे नेत्यांची राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर बैठक झाली. या बैठकीत स्वतः राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनी मनसेची युती फिस्कटली असल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणुकीत भाजप, मनसेसोबत युती करण्यासाठी तयार होती, मात्र एकनाथ शिंदे तयार नव्हते, असा आरोप राज ठाकरेंनी शिंदेवर केला. तर एकनाथ शिंदे तयार न झाल्याने मनसेचा महायुतीत चौथा पक्ष म्हणून सहभाग होऊ शकला नाही. जे लोकसभा निवडणुकीत झालं ते विधानसभा निवडणुकीतही झालं. आता महापालिका निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची एक समिती स्थापन केली जाईल. आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजप नेत्यांशी मनसेची समिती युतीसाठी बोलणी करेल, असे राज ठाकरे म्हणाले.

Published on: Jan 08, 2025 12:21 PM