Raj Thackeray : राज ठाकरे अन् दादा भुसे यांच्या टोलसंदर्भातील बैठकीत 'या' १६ निर्णयांवर शिक्कामोर्तब

Raj Thackeray : राज ठाकरे अन् दादा भुसे यांच्या टोलसंदर्भातील बैठकीत ‘या’ १६ निर्णयांवर शिक्कामोर्तब

| Updated on: Oct 13, 2023 | 1:37 PM

VIDEO | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्या टोलसंदर्भात झालेल्या बैठकीत तब्बल १६ निर्णयांवर शिक्कामोर्तब, यामध्ये मुंबईतील टोलनाक्यावरील एन्ट्री पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून ते छोट्या वाहनांचा टोल माफ करण्यापर्यंतच्या निर्णयाचा समावेश

मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही दिवसांपासून टोलसंदर्भातील मुद्द्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या टोलच्या आंदोलनाला यश आल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी मंत्री दादा भुसे यांच्याशी टोलमुद्द्यांसंदर्भात चर्चा केली. यावेळी तब्बल १६ निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. यामध्ये मुंबईतील टोलनाक्यावरील एन्ट्री पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून ते छोट्या वाहनांचा टोल माफ करण्यापर्यंतच्या निर्णयाचा समावेश असणार आहे. शिवतीर्थ या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला स्वत: मंत्री दादा भुसे हजर होते. यावेळी टोलच्या मुद्द्यावर दोन तास चर्चा झाली. या बैठकीत एकूण १६ निर्णय घेण्यात आले. कोणते आहेत ते निर्णय बघा व्हिडीओ

Published on: Oct 13, 2023 01:33 PM