रायगड जिल्हा पहिलं बरबाद होणार, राज ठाकरे यांचं शिवडी न्हावा-शेवासंदर्भात मोठं वक्तव्य

रायगड जिल्हा पहिलं बरबाद होणार, राज ठाकरे यांचं शिवडी न्हावा-शेवासंदर्भात मोठं वक्तव्य

| Updated on: Jan 07, 2024 | 6:19 PM

शिवडी न्हावा-शेवा झाल्याने रायगड बरबाद होईल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत होती. यामुलाखतीत त्यांनी न्हावा-शेवा सागरी सेतूसह विविध मुद्द्यावर भाष्य केले. न्हावा शेवा सागरी सेतूवर त्यांनी घणाघाती टिका केली

पुणे, ७ जानेवारी, २०२४ : शिवडी न्हावा-शेवा झाल्याने रायगड बरबाद होईल, असा दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तर राज ठाकरे यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलाखत होती. यामुलाखतीत त्यांनी न्हावा-शेवा सागरी सेतूसह विविध मुद्द्यावर भाष्य केले. न्हावा शेवा सागरी सेतूवर त्यांनी घणाघाती टिका केली. हा सेतू सर्वात अगोदर रायगड जिल्हा बरबाद करेल, असे वक्तव्य त्यांनी केले. बाहेरील लोक येऊन रायगडमध्ये जमिनी खरेदी करत आहेत. स्थानिक लोक जमिनी विकत आहे. हे राज्यकर्त्यांना दिसत नाही का, असा आक्रमक सवाल राज ठाकरे यांनी केला. तर जमिनी विकणारे हेच लोक पुढे नोकर होतील. या लोकांच्या हाताखाली काम करतील. हा डाव ओळखण्याचे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

Published on: Jan 07, 2024 06:19 PM