Raj Thackeray : मला दाढी आलेली दिसतेय, मी शिंदे नाही...असं का म्हणाले राज ठाकरे?

Raj Thackeray : मला दाढी आलेली दिसतेय, मी शिंदे नाही…असं का म्हणाले राज ठाकरे?

| Updated on: Nov 16, 2023 | 5:39 PM

ईडीच्या चौकशीसंदर्भात राज ठाकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधीने सवाल केला. यावर राज ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर मिश्किल उत्तर दिले आहे. राज ठाकरे म्हणाले, 'तुम्हाला मला दाढी आलेली दिसतेय. नाही ना? मी एकनाथ शिंदे नाही. मी याची उत्तरं नाही देऊ शकत'

ठाणे, १६ नोव्हेंबर २०२३ : ईडीच्या चौकशीसंदर्भात राज ठाकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधीने सवाल केला. यावेळी राज ठाकरे यांना असे विचारण्यात आले की, अनेक पक्षांतील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांच्यावर असणाऱ्या केसेस मागे घेण्यात आल्याचे पाहायला मिळाले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही नेते आणि आमदार भाजपमध्ये गेलेत. मात्र अद्याप त्यांच्यावर कोणत्याही केसेस, प्रकरणं मागे घेण्यात आल्या नसल्याचे दिसंतय. यावरून त्यांच्या पक्षात खूप खदखद असल्याचे तुम्हाला वाटते का? यावर राज ठाकरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नावर मिश्किल उत्तर दिले आहे. राज ठाकरे म्हणाले, ‘तुम्हाला मला दाढी आलेली दिसतेय. नाही ना? मी एकनाथ शिंदे नाही. मी याची उत्तरं नाही देऊ शकत.’,असे म्हणत त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मिश्किलपणे भाष्य केले.

Published on: Nov 16, 2023 05:29 PM