राष्ट्रवादीच्या फुटीवर राज ठाकरेंना शंका, सुप्रिया सुळे अन् तटकरेचं सडेतोड उत्तर; म्हणाले…
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीवर भाष्य करत जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीवर राज ठाकरे यांनी शंका उपस्थितीत केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांनी थेट उत्तर दिले आहे.
मुंबई, १० मार्च २०२४ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिवस नाशिक येथे नुकताच पार पडला. या कार्यक्रमातून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीवर भाष्य करत जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीवर राज ठाकरे यांनी शंका उपस्थितीत केलेल्या टीकेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांनी थेट उत्तर दिले आहे. काल राज ठाकरे म्हणाले, नाट्यसंमेलनात आपल्याला पाच नगरसेवक भेटायला आले. म्हणाले, नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बरं. कुणाचे? त्यातील तीन म्हणाले आम्ही शरद पवार यांचे. दोन म्हणाले अजित पवार यांचे. आले होते मात्र एकत्र. माझं ठाम मत आहे, अजूनही आतून सर्व एकच आहेत. फक्त तुम्हाला वेडं बनवलं जात आहे. मूर्ख बनवलं जात आहे. त्यांचं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राची माती होते…यावर सुळे आणि तटकरेंचं प्रत्युत्तर काय? बघा व्हिडीओ…