Raj Thackeray थेट म्हणाले, उपोषण वगैरे आपलं काम नाही

Raj Thackeray थेट म्हणाले, उपोषण वगैरे आपलं काम नाही

| Updated on: Oct 08, 2023 | 12:15 PM

ठाणे, ८ ऑक्टोबर २०२३ | 1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी झालेल्या टोल दरवाढी विरोधात मनसे नेते राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांनी टोलच्या वाढीव दरवाढीविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, ठाण्यातील अविनाश जाधव यांच्या उपोषणावर राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे […]

ठाणे, ८ ऑक्टोबर २०२३ | 1 ऑक्टोबरपासून मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी झालेल्या टोल दरवाढी विरोधात मनसे नेते राज ठाकरे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांनी टोलच्या वाढीव दरवाढीविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, ठाण्यातील अविनाश जाधव यांच्या उपोषणावर राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे थेट म्हणाले, मी अविनाश जाधव यांना फोन केला आणि सांगितलं की, असले उपोषण वैगरे करणं आपलं काम नाही. मी उद्या सकाळी येतो. गेली अनेक वर्षे टोलसंदर्भात मनसेने अनेक आंदोलनं केली. महाराष्ट्रातील अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास ६५-६७ टोलनाके आम्ही बंद केलेत. यावेळी भाजप आणि शिवसेनेचा जाहीरनामा आला होता. त्यात त्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू असं जाहीर केलं होतं. २०१४ आणि २०१७ लाही जाहीर केलं होतं. पण तुम्ही त्यांना विचारलं नाही. मला टोलच्या आंदोलनाचं काय झालं हे विचारलं जातं. पण त्याचे रिझल्ट कुणाला दिसत नाही, असे ठाकरे म्हणाले.

Published on: Oct 08, 2023 12:15 PM