राज ठाकरे म्हणाले सांताक्लॉज, जरांगे यांनी ऐकलं शांताराम, काय आहे नेमकं प्रकरण?

राज ठाकरे म्हणाले सांताक्लॉज, जरांगे यांनी ऐकलं शांताराम, काय आहे नेमकं प्रकरण?

| Updated on: Nov 23, 2023 | 11:14 AM

मराठा आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली असल्यावरून राज ठाकरे यांनी खोचक टीका केली. ... ते काय सांताक्लॉज आहेत का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे म्हणाले सांताक्लॉज अन् जरांगे यांनी ऐकलं शांताराम...

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२३ : सरकारने शब्द न पाळल्यास मुंबईत आंदोलन करू असा इशारा दिला आहे. मात्र ते काय सांताक्लॉज आहेत का? असं वक्तव्य केले आणि यानंतर मराठा आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. तर राज ठाकरे नेमकं काय बोलले हे नीट ऐकून पुन्हा प्रतिक्रिया देईल असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. याआधी स्वतः राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात भेट घेतली. तर जालन्यातील लाठीचार्जवरून गृहविभागावर टीकाही केली. मात्र आता जरांगेंच्या मागे कोण आहेत. याची शंका व्यक्त करत यामागे राजकारण असल्याची शक्यता वर्तविली आहे. तर मराठा आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरची मुदत दिली असल्यावरून राज ठाकरे यांनी खोचक टीका केली. … ते काय सांताक्लॉज आहेत का? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे म्हणाले सांताक्लॉज अन् जरांगे यांनी ऐकलं शांताराम…

Published on: Nov 23, 2023 11:14 AM