Raj Thackeray यांचा सत्ताधारी अन् विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, ‘आता त्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या’
VIDEO | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर काल संभाजीनगरमध्ये झालेल्या कॅबिनेट बैठकीवर आणि यावेळी राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनांवर राज ठाकरे यांची जोरदार टीका, बघा नेमकं काय म्हणाले?
मुंबई, १७ सप्टेंबर २०२३ | छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर काल राज्यातील कॅबिनेटची बैठक पार पडली. यावेळी राज्य सरकारने मराठवाड्यासंदर्भात मोठ्या घोषणा केल्या. सरकारने केलेल्या या घोषणांवर विरोधकांकडून चांगलाच हल्लाबोल होत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील एक ट्वीटकरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करत असताना फक्त ‘फोटो-ऑप’ म्हणून कार्यक्रम साजरे करणं किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशकं सुरु आहे, आणि यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे. अशावेळेस एकांनी आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं याचा विचार करावा’, असे राज ठाकरे म्हणाले.