Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चलबिचल सुरू झाली अन्
VIDEO | राज ठाकरे आणि मंत्री दादा भुसे यांच्यातील टोलनाक्याबाबतची चर्चा यशस्वी झाली आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. ९ वर्षानंतर टोलच्या विषयासाठी सह्याद्रीला गेलो, ९ वर्षांनंतर पुन्हा टोलचा विषय पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई, १३ ऑक्टोबर २०२३ | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी टोलच्या मुद्द्यावर चर्चा झाली. काल नऊ वर्षानंतर टोलच्या विषयासाठी सह्याद्रीला गेलो होतो. टोलच्या मुद्द्यासंदर्भात काल सह्याद्रीला बैठक झाली. तिथे काही गोष्टी ठरल्या. नऊ वर्षापूर्वी गेलो तेव्हा पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी काही गोष्टी ठरल्या होत्या. काही सुरू झाल्या होत्या. त्याचवेळी मला समजलं होतं टोलचे अॅग्रीमेंट 2026 ला संपणार आहे. पण त्यात काही सुधारणा होणं गरजेचं होतं त्यांच्या सूचना मी केल्या होत्या. त्यावेळी जे अॅग्रीमेंट झाले त्यातही काही चुकीच्या गोष्टी होत्या. पण ते अॅग्रीमेंट बँकेसोबत झाल्याने त्यात काही करता येत नव्हते. पण त्यावेळी काही सुधारणा व्हायला हव्या होत्या. त्या झाल्या नाहीत, असं राज ठाकरे यांनी सांगितल्या. दरम्यान, ९ वर्षांनंतर पुन्हा हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य केलं. ते म्हणजे कोणत्याच टोलनाक्यांवर लहान वाहनांना टोल नाही. असं वक्तव्य आल्यानंतर चलबिचल सुरू झाल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले.