मुलुंडच्या 'त्या' प्रकरणावरून राज ठाकरे यांचा इशारा; म्हणाले, 'महाराष्ट्रात जर पुन्हा असं घडलं तर...'

मुलुंडच्या ‘त्या’ प्रकरणावरून राज ठाकरे यांचा इशारा; म्हणाले, ‘महाराष्ट्रात जर पुन्हा असं घडलं तर…’

| Updated on: Sep 29, 2023 | 1:04 PM

VIDEO | मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला ऑफिस जागेसाठी घर नाकारण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करून या प्रकरणी सरकारलाच भरला सज्जड दम, म्हणाले...'हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे. '

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ | मुलुंड येथील सोसायटीमध्ये ऑफिससाठी जागा बघायला गेलेल्या मराठी महिलेला नकार देण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. ही महिला केवळ मराठी असल्याने तिला मुलुंडमधील जागा नाकरण्यात आल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. याप्रकरणी मनसेने जाब विचारला असता त्या सोसायटीने माफी मागितली असली तरी आता या मुद्द्याला राजकीय रंग प्राप्त झाले आहे. याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्वीट केल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात पुन्हा असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे म्हणत थेट इशारा दिल्याचे पाहायला मिळाले तर सरकारने पण आपला धाक दाखवला पाहिजे असे म्हणत सज्जड दमच दिला आहे. ‘हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. आणि सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे.’

Published on: Sep 29, 2023 12:56 PM