'प्रत्येक महाराष्ट्र सैनिक...', राज ठाकरे यांनी स्वतःच्या हातानं लहानसं पत्र लिहून पदाधिकाऱ्यांना केलं आवाहन

‘प्रत्येक महाराष्ट्र सैनिक…’, राज ठाकरे यांनी स्वतःच्या हातानं लहानसं पत्र लिहून पदाधिकाऱ्यांना केलं आवाहन

| Updated on: Mar 06, 2024 | 4:15 PM

'प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांना भावासारखं जपा', असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी एक पत्र लिहित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन केले. या पत्रावर राज ठाकरे यांची स्वाक्षरी देखील आहे.

मुंबई, ६ मार्च २०२४ : ‘प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांना भावासारखं जपा’, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी एक पत्र लिहित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. त्यात राज ठाकरे यांनी ‘सस्नेह जय महाराष्ट्र… प्रत्येक महाराष्ट्र सैनिक भावासारखा जपा… कधीही त्याला कार्यकर्ता म्हणू नका, सहकारी म्हणा… शुभेच्छा, राज ठाकरे’ असा मजकूर लिहिला आहे. असा मजकूर राज ठाकरे यांनी स्वतःच्या हाताने एका कागदावर लिहिला आहे. या पत्रावर राज ठाकरे यांची स्वाक्षरी देखील आहे. त्यांनी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांना भावाप्रमाणे वागविण्याचे आवाहन केले आहे. तर सर्वच राजकीय पक्षांनी आदर्श घ्यावा असा मजकूर या पत्राद्वारे राज ठाकरे यांनी लिहिल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, लोकसभेपूर्वी ‘मनसे’ची मोर्चेबांधणी सुरू झाली असून या दौऱ्यांतर्गत राज ठाकरे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. ७ ते ९ मार्चदरम्यान राज ठाकरे हे नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर ११ मार्च रोजी दक्षिण मुंबई, १२ मार्च रोजी दक्षिण मध्य मुंबई, १३ मार्च उत्तर मध्य मुंबई, १४ मार्च इशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कार्यालयाला राज ठाकरे भेट देऊन ते बैठका घेणार आहेत.

Published on: Mar 06, 2024 04:15 PM