मनसे दीपोत्सव! विकी कौशलचं कौतुक करताना राज ठाकरे म्हणाले…

| Updated on: Nov 11, 2023 | 3:52 PM

या दीपोत्सवात राज ठाकरेंचा नातू चांगलाच लक्ष वेधून घेत होता. कधी आजोबांच्या कडेवर, कधी मांडीवर, कधी वडिलांच्या खांद्यावर...राज ठाकरेंच्या नातवाचे फोटो व्हायरल होतायत. मनसेच्या दीपोत्सवाचा शुभारंभ गुरुवारी सलीम –जावेद यांच्या हस्ते केला गेला. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अभिनेता विकी कौशल देखील उपस्थित होता. दीपोत्सवाच्या संदर्भातले ट्वीट मनसेच्या अधिकृत हँडलवरून करण्यात आले होते.

मुंबई, 11 नोव्हेंबर 2023 | मनसेच्या दीपोत्सवाचं यंदा अकरावे वर्ष. सलीम-जावेद यांच्या शुभहस्ते ‘दीपोत्सव 2023’ चं उद्धाटन झालं. शिवाजी पार्कवर हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. साकारलेल्या दीपोत्सवाची संकल्पना राज ठाकरे यांची होती. या दीपोत्सवात राज ठाकरेंचा नातू चांगलाच लक्ष वेधून घेत होता. कधी आजोबांच्या कडेवर, कधी मांडीवर, कधी वडिलांच्या खांद्यावर…राज ठाकरेंच्या नातवाचे फोटो व्हायरल होतायत. मनसेच्या दीपोत्सवाचा शुभारंभ गुरुवारी सलीम –जावेद यांच्या हस्ते केला गेला. दीपोत्सवाच्या संदर्भातले ट्वीट मनसेच्या अधिकृत हँडलवरून करण्यात आले होते. या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला सलीम-जावेद, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि राज ठाकरेंचं कुटुंबीय यासहित अनेक दिग्गज उपस्थित होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला अभिनेता विकी कौशल देखील उपस्थित होता. यावेळी राज ठाकरेंनी अभिनेता विकी कौशलच्या कामाचं कौतुक केलं. विकी कौशल उत्तम अभिनेता असून पुढच्या चित्रपटात तो संभाजी राज्यांच्या भूमिकेत असणार आहे असं राज ठाकरे म्हणालेत.

Published on: Nov 11, 2023 01:45 PM