टोलधाड कधी बंद? मुंबईतील टोल दरवाढीविरोधात मनसे अन् राज ठाकरे आक्रमक
tv9 Special Report | मुंबईतील दहिसर टोल नाका, मुलुंडचा आनंद नगर टोल नाका, मुलुंड-ठाणे मार्गावरील टोलनाका, ठाणे- ऐरोली टोल नाका आणि सायन-पनवेल टोलनाका या पाचही टोलनाक्यांवर टोल दरवाढ, या टोल दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांनी घेतली आक्रमक भूमिका
मुंबई, ९ ऑक्टोबर २०२३ | मुंबई प्रवेशाच्या पाचही टोलनाक्यांवरच्या दरवाढीच्या मुद्द्यावरुन मनसेनं सरकारवर टीका केलीय. मनसेचे अविनाश जाधव दरवाढीविरोधात उपोषणाला बसले होते., राज ठाकरेंनी उपोषणस्थळी भेट देवून सरकारवर टीका केली. विशेष म्हणजे यावर बोलताना राज्याच्या कोणत्याही टोलनाक्यांवर खासगी चारचाकी वाहनांना टोल लागत नसल्याचा अजब दावा फडणवीसांनी केलाय. राज्यातल्या काही नाक्यांवर खासगी चारचाकी वाहनांना टोलमुक्ती आहे. मात्र इतर अनेक टोलनाक्यांवर चारचाकी गाडीलाही टोल लागतो, हे वास्तव आहे. दहिसर टोल नाका, मुलुंडचा आनंद नगर टोल नाका, मुलुंड-ठाणे मार्गावरील टोलनाका, ठाणे- ऐरोली टोल नाका आणि सायन-पनवेल टोलनाका या पाचही टोलनाक्यांवर सरकारनं दरवाढ केलीय. दरम्यान, सरकार ही टोलवाढ मागे घेईल की नाही, हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र टोलच्या निमित्तानं मनसे पुन्हा सक्रीय झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था, मराठी पाट्या, मराठी लोकांना नाकारली जाणारी घरं यानंतर मनसेनं पुन्हा एकदा टोलदरवाढीचा मुद्दा हाती घेतला आहे.