‘देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते तर…’, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांचा हल्लाबोल
VIDEO | जालन्यातील अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला
जालना, ४ सप्टेंबर २०२३ | जालन्यातील सराटी येथे झालेल्या लाठीचार्ज प्रकरणाची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात दाखल होत त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलेच टीकास्त्र सोडले. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे थेट म्हणत राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. ‘देवेंद्र फडणवीस म्हणाले, झालेल्या घटनेचं राजकारण करू नये. अरे वाह! हे जर विरोधी पक्षात असते. तर यांनी हेच राजकारण केलं असतं ना? मी इथं राजकारण करायला नाही आलो. पण ज्यावेळी मी लाठीमाराचे व्हीडिओ पाहिले आणि मला राहावलं नाही म्हणून भेटायला आलोय. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि या भेटीत त्यांच्या कानावर हा विषय टाकेन, पण त्यातून काय मार्ग निघेल हे मी आताच सांगत नाही, मला या लोकांसारखी कोणतेही आमिष दाखवता येत नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.