राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना काय आलं उधाण?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे यांचा भाचा यश देशपांडे यांच्या साखरपुड्यात ठाकरे बंधू एकत्र आले होते. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात.
मुंबई, २३ डिसेंबर २०२३ : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे यांचा भाचा यश देशपांडे यांच्या साखरपुड्यात ठाकरे बंधू एकत्र आले होते. यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशा चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय टोलेबाजी सुरूच असते. ठाकरे गटाने अदानीविरोधात काढलेल्या मोर्च्यावरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला होता. तर दिशा सालियान प्रकरणी सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. याप्रकरणात शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. गेल्या काही दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकमेकांविरोधात बोलताना सावध भूमिका घेताना दिसतात. शर्मिला ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठराखण केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले होते.