‘राज ठाकरे बाळासाहेबांचे प्रतिरूप, त्यांना धनुष्यबाणाच्या मंचावर बघायला मराठी माणूस उत्सुक’
महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांची आज पहिल्यांदाच ठाण्यात सभा होत आहे. शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंच्या या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे नेमकं काय बोलणार?
राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिरूप आहेत, मराठी माणूस राज ठाकरेंना धनुष्यबाणाच्या मंचावर बघायला उत्सुक आहेत, असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे. ठाकरेंनी हिंदुत्वासोबत असावं ही हिंदुत्वाची इच्छा पूर्ण होणार. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे महान व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यावर मी फार बोलणार नाही, असं वक्तव्य करत राजू पाटील यांनी राऊतांवर टीका केली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांची आज पहिल्यांदाच ठाण्यात सभा होत आहे. शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरेंच्या या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेच्या निमित्ताने मनसे आमदार राजू पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद सांधताना हे मोठं वक्तव्य केले आहे.