झाशीची राणी, आनंदीबाई जोशी यांचं उदाहरण देत राज ठाकरेंनी महिलांच्या कर्तृत्वाला दाद दिली; पाहा…
Raj Thackeray : महिलांसाठी एक दिवस का साजरा करायचा हे मला कळत नाही. आज महिला दिन झाला मग उद्या काय करायचं? वटपौर्णिमेला दोरे बांधणाऱ्या भगिनींचं वाईट वाटतं, कुणी सांगितलंय, चॉईस आहे की नाही, अशी मिश्किल टिपण्णी राज ठाकरे यांनी केली आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिला दिनानिमित्त उपस्थितांना संबोधित केलं. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी अतुलनीय काम केलं. त्यावेळी जे धाडस केलं त्यामुळे आज तुम्ही उभं राहू शकता. आजही कित्येक जणी असतील. ज्या धाडसाने उभ्या राहू इच्छित असतील. त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. महिला दिन जगातला सर्वात मोठा दिन… हा दिवस 8 मार्चला सुरू होतो आणि पुढच्या वर्षी 7 मार्चला संपतो… एकूण काय? तर वर्षभर ऐकून घ्यावंच लागतं… याचं उत्तर पुरुषांना विचारा…, असंही राज ठाकरे म्हणाले.