Raj Thackeray : एकनाथ शिंदेंनंतर पुढचा मुख्यमंत्री कोण? राज ठाकरेंनी थेट नाव घेत केलं भाकीत
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला खास मुलाखत दिली. टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.
विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचं सरकार येणार असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून केलं होतं. यासंदर्भात राज ठाकरे यांनी मुलाखत सोमवारी टीव्ही 9 मराठीला खास मुलाखत दिली. त्यावेळी राज ठाकरे यांनी विविध प्रश्नांवर उत्तर दिले. इतकंच नाहीतर राज्यात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याचं भाकीतही त्यांनी वर्तविलं. राज ठाकरे म्हणाले, भाजपचं सरकार येणार म्हणजे युतीचं सरकार येणार. माझं असं भाकीत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. या गोष्टीचे संकेत दोनदा अमित शाह यांनी दिले. त्यांच्या पक्षाचे नेते भाकीत करत आहे, असं म्हणत माझं काय घेऊन बसलात असंही मिश्कील भाष्य राज ठाकरेंनी केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंचं देखील कौतुक केले. “एकनाथ शिंदे दानशूर माणूस आहे. सत्तेतील माणूस दानशूर पाहिजे. सत्तेतील माणसाचे दोन्ही हात मोकळे पाहिजे. मी त्यांना भेटलो. त्यांनी पटापट निर्णय घेतले. बीडीडी चाळी वगैरे. पुण्यातील दोन मुलांचा शॉक लागून मृत्यू झाला. शिंदेंनी एका मिनिटात १० लाखाचा चेक दिला. काँग्रेसचा मुख्यमंत्री असता तर त्याने करू म्हटलं असतं”, असं म्हणत राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं.