‘ज्याने केलंय त्याला पहिलं…’, संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर राज ठाकरे यांनी दिला इशारा
VIDEO | मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क येथे झालेल्या हल्ल्याबाबत काय म्हणाले राज ठाकरे, बघा व्हिडीओ
ठाणे : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर ३ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे. आज मनसेचा १७ वा वर्धापन दिन असून या निमित्ताने ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे मनसेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांच्यावरील हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ज्याने हल्ला केलाय त्याला आधी समजेल, मग सर्वांना समजेल, अशा शब्दात राज ठाकरे यांनी चांगलेच फटकारले आहे. राज ठाकरे यांनी संदीप कुठे आहे आपला, म्हणत संदीप देशपांडे यांना मंचावर बोलावलं. तसेच यावेळेस आत्मचरित्राची 4 पानं वाढली, असं म्हणत राज ठाकरे यांनी मिश्किल भाष्य केले आणि उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ झाला.
Published on: Mar 09, 2023 09:38 PM
Latest Videos