राज ठाकरे यांनी मराठी कलावंतांना हात जोडले अन् काय केली विनंती?

राज ठाकरे यांनी मराठी कलावंतांना हात जोडले अन् काय केली विनंती?

| Updated on: Jan 07, 2024 | 5:58 PM

आता इथे शरद पवार साहेब आले तर त्यांना मी वाकून नमस्कार करेन. माझ्या महाराष्ट्रातील एक बुजुर्ग नेता आहे. व्यासपीठावर राजकीय काय बोलायचं हा विषय वेगळा आहे. मला वाटतं तुम्ही उलटं करतात. हातजोडून विनंती आहे. तुम्ही एकमेकांना मान द्या

पुणे, ७ जानेवारी, २०२४ : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय दृष्ट्या एक उदाहरण सांगितले. समजा आता इथे शरद पवार साहेब आले तर त्यांना मी वाकून नमस्कार करेन. माझ्या महाराष्ट्रातील एक बुजुर्ग नेता आहे. व्यासपीठावर राजकीय काय बोलायचं हा विषय वेगळा आहे. मला वाटतं तुम्ही उलटं करतात. हातजोडून विनंती आहे. तुम्ही एकमेकांना मान द्या. संपूर्ण नाव द्या. तुम्ही त्यांना सर म्हणा. अरुण सरनाईक यांना कुणी आरू बिरू हाक मारलेली. मला नाही आठवत श्रीराम लागूंना शिरू बिरू हाक मारलेली मला नाही आठवत. लागू साहेब आलेत, लागू सर आलेत, त्या लोकांनीही त्यांचा आब राखला होता. त्यामुळे आताच्या कलाकारांनी देखील ही बाब लक्षात घेतली पाहिजे असे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी कलाकारांना एकमेकांना आदर देण्याविषयी मत मांडले. त्यांनी यावेळी एक किस्सा सांगितला. ‘एका दिग्दर्शकाला मध्यंतरी भेटलो. एका मराठी कलावंताबद्दल बोललो. तो बोलला कोण आहे हा. मी कधी नाव ऐकलं नाही. चारपाच हिंदी सिनेमात त्याने काम केलेलं होतं. तरीही ओळखत नव्हता. मी त्याचं ऊर्फ नाव सांगितलं. त्यावर दिग्दर्शक म्हणाला, अरे वोह… अच्छा लडका है, अच्छा लडका है…म्हणजे? तिथपर्यंत असल्या नावांची ख्याती पोहोचली तुमची’, हे योग्य नाही. मला वाटतं आज सर्वांनी शपथ घेतली पाहिजे, अशा नावाने हाक मारणार नाही. एकमेकांना मान देऊ आणि मान घेऊ.’ असेही राज ठाकरे म्हणाले.

Published on: Jan 07, 2024 05:58 PM