एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं नेतृत्व राज ठाकरेंकडे जाणार? काय केलं मोठं विधान?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं नेतृत्व राज ठाकरेंकडे जाणार? काय केलं मोठं विधान?

| Updated on: Apr 09, 2024 | 9:05 PM

'मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. आता माझ्या मनात विचार नाही. उद्या पाऊल उचललं तर स्वतःचा पक्ष काढेन पण मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी मनात खुणगाठ बांधली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय कुणाच्या हाताखाली काम करणार नाही.', राज ठाकरे यांनी भरसभेत स्पष्ट केलं.

राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख होणार? अरे मूर्खानो मला व्हायचे असते तर तेव्हाच झालो नसतो का? असे म्हणत राज ठाकरेंनी माध्यमांवरच खोचक टीका केली. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोटही केला. ‘तेव्हा ३२ आमदार सहा सात खासदार म्हणाले. आपण एकत्र बाहेर पडू. माझा दौरा सुरू केला. त्यांना वाटलं मी काँग्रेसमध्ये जाईन. मी त्यांना पहिल्यांदाच सांगितलं की मला पक्ष फोडून कोणतीही गोष्ट करायची नाही. आता माझ्या मनात विचार नाही. उद्या पाऊल उचललं तर स्वतःचा पक्ष काढेन पण मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. ही गोष्ट मी मनात खुणगाठ बांधली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय कुणाच्या हाताखाली काम करणार नाही. तरीही एकाला संधी दिली होती. समजलंच नाही. जाऊन दे. तो झाला भूतकाळ. त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष होणार नाही. मी जे मनसे नावाचं अपत्य जन्माला घातलंय त्याचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. १८ वर्ष झाली. असली गोष्ट मनाला शिवतही नाही.’, असे म्हणत राज ठाकरेंनी मोठा खुलासा केला.

Published on: Apr 09, 2024 09:05 PM