भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्न सोहळ्यात राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंमध्ये रंगला संवाद

भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्न सोहळ्यात राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंमध्ये रंगला संवाद

| Updated on: Dec 22, 2024 | 3:01 PM

मुंबईतील एकाच लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची हजेरी पाहायला मिळाली. तर या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातही संवाद झाला.

मुंबईतील दादरमध्ये राज ठाकरे यांच्या सख्या बहि‍णीच्या मुलाचा आज लग्न सोहळा आहे. या लग्न सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र दिसले असून त्यांच्यात कौटुंबिक संवाद बघायला मिळाला. मुंबईतील एकाच लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची हजेरी पाहायला मिळाली. तर या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातही संवाद झाला. राज ठाकरे यांच्या सख्या बहि‍णीच्या मुलाचा लग्नाच्यावेळी खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले. दोन्ही ठाकरे बंधूंनी काही वेळ एकमेकांशी संवाद साधल्याचे दिसले. तर गेल्या काही दिवसांपूर्वी देखील उद्धव ठाकरे यांच्या कौटुंबिक सोहळ्याला राज ठाकरे हे उपस्थित होते. रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि श्रीधर पाटणकर यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात राज ठाकरे हे उपस्थित होते. त्यावेळी रश्मी ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले होते. मात्र त्या लग्न सोहळ्यात दोन्ही ठाकरे बंधूंची भेट थोडक्यात चुकली होती. मात्र आजच्या लग्नात दोघेही एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाविरोधात हे दोन्ही बंधू एकत्र उभे ठाकताय का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Published on: Dec 22, 2024 03:01 PM