Raj Thackeray यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’मुळे देवेंद्र फडणवीस सापडले कोंडीत?
VIDEO | राज्यातील टोलनाक्यांवरील टोल दरवाढीच्या मु्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आक्रमक झाले आहे. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी टोलवरून दिलेल्या प्रतिक्रियेचे व्हिडीओ दाखवत, देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच घेरल्याचे पाहायला मिळाले
मुंबई, ९ ऑक्टोबर २०२३ | भाजप-शिवसेनेचं सरकारचं होतं तेव्हा महाराष्ट्र टोलमुक्त करू असं म्हटलं होतं. राज्यातील सर्व टोलवर चारचाकी गाड्या, लहान वाहनांना टोल नसून केवळ कर्मशिअल वाहनांना टोल आकारला जात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. यावरून राज ठाकरे यांनी फडणवीस यांची उलट तपासणी केली आहे. राज ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस काल टोलबाबत जे म्हणाले ते खरं आहे का? याला धांदात खोटं असंच म्हणायचं ना? मग हे पैसे जातात कुठे? कुणाकडे जातात? खऱ्या अर्थाने पाहिलं तर टोल हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा स्कॅम आहे. याची शहानिशा झाली पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी सरकारकडे केली. दोन दिवसानंतर मी टोलच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. फोर व्हिलर, टू व्हिलरला टोल नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्याप्रमाणे आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभे राहतील आणि फोर व्हिलर, टू व्हिलरला कोणत्याही प्रकारचा टोल लावू दिला जाणार नाही आणि याला जर कुणी विरोध केला तर हे टोलनाके जाळू. पुढे काय सरकारला करायचे ते सरकारनं करावं, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला.