बदलापूरच्या घटनेवरून राज ठाकरेंचा संताप, 'तुम्हाला बहीण खरंच लाडकी असेल तर....'

बदलापूरच्या घटनेवरून राज ठाकरेंचा संताप, ‘तुम्हाला बहीण खरंच लाडकी असेल तर….’

| Updated on: Aug 21, 2024 | 5:30 PM

राज ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटरवरुन बदलापूरमधील घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. “जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ?” असा थेट सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

बदलापूरमध्ये घडलेल्या संतापजनक घटनेचे तीव्र पडसाद बदलापुरच नाहीतर राज्यभरात उमटत आहे इतकेच नाहीतर मोठे आंदोलन करण्यात येत आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या संतापजनक प्रकारानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे. जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. आज सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का? असा सवाल राज ठाकरेंनी सरकारला केला आहे. तर . माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Published on: Aug 21, 2024 05:30 PM