Uddhav Thackeray : अमित ठाकरे यांना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले….
माहिम मतदारसंघात पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात असलेल्या राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पाठिंबा का नाही? याबद्दल पहिल्यांदाच टिव्ही ९ मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय.
शिवरायांची शपथ घेतो की महाराष्ट्र लुटणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्यांना कधीही पाठिंबा नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या पाठिंब्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. टिव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय की, अमित ठाकरेंना पाठिंबा नाही. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांना कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून वरळीमध्ये पाठिंबा दिला, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टिव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र माझं कुटुंब असून लुटारूंना मदत करणाऱ्य़ांना मदत नाही, असं स्पष्ट मत मांडलंय. दरम्यान, टिव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे सारखं लुटारू असा उल्लेख करत होते. त्यामुळे लुटारू नेमकं कोण? असा सवाल थेट उद्धव ठाकरेंना करण्यात आला. लुटारूंना उत्तर देताना आजारपणात नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंवरही उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हे जाहीर भाषणातून उद्धव ठाकरेंना जनाब वरून घेरतायत, त्यावरूनही उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केलंय. बघा स्पेशल रिपोर्ट