BIG BREAKING : मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा, राज ठाकरेंची मोठी घोषणा
राज ठाकरे आजच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महायुतीला पाठिंबा देणार की नाही? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून मोठी घोषणा केली. ते म्हणाले, 'देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी.... काय म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे?
राज ठाकरे आजच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महायुतीला पाठिंबा देणार की नाही? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. दरम्यान, राज ठाकरे यांनी जाहीर सभेतून मोठी घोषणा केली. ते म्हणाले, ‘देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं की, मला काही अपेक्षा नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांच्या महायुतीला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे’, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करत शिवतीर्थावरील गुढीपाडव्या मेळाव्यातून मोठी घोषणा केली. पुढे ते असेही म्हणाले की, “आजच्या परिस्थितीत मी पाहतो. तेव्हा पुढच्या ५० वर्षाचा विषय़ करायचा असतो. पण मी बसलो तेव्हा सीएम आणि फडणवीस यांच्याशी बोललो. म्हटलं वाटाघाटीत पाडू नका. मी तुम्हाला आज सांगतो. राज्यसभा नको आणि विधान परिषद नको. पण या देशाला चांगल्या नेत्याची गरज आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्या पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहे. मला काही अपेक्षा नाही. मनसे भाजप, शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे. हे जाहीर करतो”, असेही ते म्हणाले.